File Photo 
Latest

आपत्ती निवारणासाठी २२ राज्यांना केंद्राकडून ७५३२ कोटींचा निधी 

backup backup
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील अनेक राज्ये सध्या नैसर्गिक आपत्तीशी झगडत आहेत. या पार्श्वभूमीवर 22 राज्यांना केंद्र सरकारकडून 7 हजार 532 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एसडीआरएफ) खात्यात हा पैसा वर्ग करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
गृह मंत्रालयाने केलेल्या शिफारशीनुसार सदरचा निधी राज्यांना देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने निधी देण्याबाबतचे निकष शिथील करण्यात आले आहेत. केंद्राकडून निधीजारी करण्यापूर्वी पैशाच्या वापराबाबतचे प्रमाणपत्र मागविले जाते. मात्र यावेळी ही अट घालण्यात आलेली नाही. सर्वसाधारण राज्यांसाठी एसडीआरएफमधील केंद्राची हिस्सेदारी 75 टक्के इतकी असते तर ईशान्य भारत आणि हिमालय पर्वत रांगा असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून 90 टक्के इतका निधी दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT