Latest

राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ७४ टक्के मतदान

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ७४ टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपद तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे रविवारी प्रत्यक्षात ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत प्राथमिक माहितीनुसार ६७ टक्के मतदान झाले होते. आता २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे १३५, पालघर ६२, रायगड १९१, रत्नागिरी १६३, सिंधुदुर्ग २९१, नाशिक १८८, धुळे ११८, जळगाव १२२, अहमदनगर १९५, नंदुरबार ११७, पुणे १७६, सोलापूर १६९, सातारा २५९, सांगली ४१६, कोल्हापूर ४२९, औरंगाबाद २०८, बीड ६७१, नांदेड १६०, उस्मानाबाद १६५, परभणी ११९, जालना २५४, लातूर ३३८, हिंगोली ६१, अमरावती २५२, अकोला २६५, यवतमाळ ९३, बुलडाणा २६१, वाशीम २८०, नागपूर २३४, वर्धा १११, चंद्रपूर ५८, भंडारा ३०४, गोंदिया ३४५, गडचिरोली २५. एकूण ७ हजार १३५.

हेही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT