पुढारी ऑनलाईन डेस्क : लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. या परिसरात झालेल्या वाहन अपघातात आतापर्यंत 7 भारतीय लष्कराच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. या वाहनात एकूण 26 जवान होते. अपघातात अनेक जवान जखमी झाले असून त्यांना भारतीय हवाई दलाच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी श्योक नदीत लष्कराचे एक वाहन कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी भारतीय लष्कराचे वाहन परतापूरहून उपसेक्टर हनीफकडे जात होते, असे समजते आहे. वाहन रस्त्यावरून घसरल्याने सुमारे 50 ते 60 फूट खाली नदीत पडले.