घरगुती गौरी-गणपती आज विसर्जन; जाणून घ्या विधी File Photo
Ganeshotsav

घरगुती गौरी-गणपती आज विसर्जन; जाणून घ्या विधीतील ५ मुद्दे

प्रार्थनेनंतर 'या' मंत्रांनी अक्षता वहाव्यात

पुढारी वृत्तसेवा

घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन गुरुवारी (दि. 12) विसर्जन होणार आहे. गौरी-गणपती विसर्जन विधी कसा करावा हे जाणून घ्या सविस्तर . (Ganesh Festival 2024)

'हा' संकल्प करावा

श्री गणेश विसर्जनाचा विधी

दुपारनंतर स्नान करून, सोवळे नेसून, पाटावर बसून आचमन करावे व पुढील संकल्प करावा.

अध्येत्यदिपूर्वाच्चारितएवंगुणविशेषेणविशिष्टायां

शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त

लोप्रात्यर्थ श्रीपार्थिवमगाणिपतिदेवताप्रीत्यर्थं पंचोपचारेः उत्तरपूजनंकरिष्ये ।

असे म्हणून उदक सोडावे.

गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य मंत्रांनी अर्पण करावेत 

गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य मंत्रांनी अर्पण

उदक सोडल्यानंतर गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे उपचार पूर्वी पूजाप्रयोगात सांगितलेल्या मंत्रांनी अर्पण करावेत. उदाहरणार्थ -

श्रीपार्थिवमहागणपतये नमः। विलेपनार्थ चंदनं समर्पयामि।

श्रीपार्थिवमहागणपतये नमः। पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि।

श्रीपार्थिवमहागणपतये नमः। दीपं समर्पयामि।

श्रीपार्थिवमहागणपतये नमः। धूपं समर्पयामि।

श्रीपार्थिवमहागणपये नमः। नैवेद्यार्थे खाद्यनैवेदं समर्पयामि।

श्रीपार्थिवमहागणपतये नमः। नैवेद्यार्थे खाद्यनेवेद्य समर्पयामि ।

नंतर विडा, दक्षिणा, फल ठेवावे.

देवाची प्रार्थना...

देवाची प्रार्थना...

आरती, मंत्रपुष्प, दुर्वासमर्पण इ. झाल्यावर प्रार्थना करावी. शेवटी अनेन यथाज्ञानेन यथामीलितोचारेः कृत उत्तर पूजनेन भगवान श्रीपार्थिवमहागणपतिः प्रीतयाम्। असे म्हणून उदक सोडावे. कुटुंबातील सर्वांनी गणपतीला गंध-फूल, दुर्वा वाहाव्यात. नमस्कार करावा. देवाची प्रार्थना हात जोडून करावी. कृपादृष्टी ठेवा हीच प्रार्थना ! मंगलमूर्ती मोरया ! अशी गर्जना सर्वांनी करावी.

प्रार्थनेनंतर 'या' मंत्रांनी अक्षता वहाव्यात

विसर्जनाच्या अक्षता

प्रार्थना केल्यानंतर पुढील मंत्रांनी देवावर विसर्जनाच्या अक्षता वहाव्यात. तो मंत्र असा -

यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।

इष्टकामप्रसिद्धयर्थ पुनरागमनाय च ॥

घरी परत आल्यानंतर...

अक्षता घातल्यावर मूर्ती जरा सरकवावी

अक्षता घातल्यावर मूर्ती जरा सरकवावी. नंतर इष्टमित्र, कुटुंबीय मंडळींसह ती मूर्ती जलाशय, नदी, समुद्र इत्यादी पवित्रस्थळी पोहोचवावी. जाताना देवाबरोबर दही, भात, पोहे इ. शिदोरी म्हणून देण्याचा प्रघात आहे. घरी परत आल्यावर सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती म्हणावी. पूजा आपण स्वतःच केली असेल तर देवापुढील विडा, दक्षिणा दान द्यावी किंवा सत्कार्यार्थ अर्पण करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT