कोल्हापूर, विकास कांबळे : सहा महिन्यापासून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना तसेच गरोदर व स्तनदा मातांना जिल्ह्यात महिन्याला सुमारे 5 कोटींचा पोषण आहार दिला जातो. यामध्ये 3 ते 6 वयोगटातील बालकांची संख्या 98 हजार 667 इतकी आहे; तर गरोदर व स्तनदा मातांची संख्या 26 हजार 237 इतकी आहे. या आकडेवारीत दर महिन्याला फरक पडत असतो. साधारणपणे 3 हजार 100 क्विंटल इतके धान्य पोषण आहार म्हणून वितरित होते.
जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने 3 ते 6 वयोगटातील बालकांना अंगणवाडीमध्ये पोषण आहार दिला जातो. हा आहार तयार शिजवून दिला जातो. 6 महिन्यापासून 3 वर्षापर्यंतच्या बालकांना तसेच गरोदर महिला व स्तनदा माता यांना घरात जाऊन पोषण आहार दिला जातो. 3 वर्षापर्यंतच्या बालकांची संख्या 72 हजार 963 आहे.
अंगणवाडीतील मुलांसाठी देण्यात येणार्या पोषण आहारावर साधारणपणे 2 कोटी 40 लाख इतके खर्च होतात. 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या बालकांना तसेच गरोदर व स्तनदा माताना घरपोच देण्यात येणार्या पोषण आहाराची रक्कम साधारणपणे 2 कोटी 5 लाख इतकी होते.
दोनच ठेकेदार
बालकांच्या तसेच गरोदर महिला व स्तनदा माता यांना पोषक आहार मिळावा म्हणून शासनाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. परंतु लाभार्थ्यांची संख्या लाखात असताना संपूर्ण जिल्ह्याला केवळ दोनच ठेकेदार आहाराचा पुरवठा करत आहेत.
प्रतिलाभार्थी देण्यात येणारी रक्कम
अंगणवाडीतील मुले : 8 रुपये
6 ते 3 वर्षापर्यंतची मुले : 8 रुपये
गरोदर महिला व स्तनदा माता : 9 रुपये 50