कोल्हापूर : पोस्टाच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकही लोकाभिमुख असून विमा क्षेत्रातही बँकेने पाऊल ठेवले आहे. या सुविधेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने डाक विभाग कोल्हापूरमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत दोन खासगी विमा कंपन्यांचे विमा उघडले जात आहेत. 795 रुपयांत 20 लाखांचा अपघाती विमा या दोन्ही कंपन्यांमार्फत सुरू आहे. कमी रकमेत अपघात विम्याची ही योजना सर्वसामान्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणारी ठरली आहे.
68 कुटुंबीयांना 10 लाखांचा लाभ
सन 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये टाटा एआयजी विमा कंपनीतर्फे 44 जणांना 10 लाखांची विमा भरपाई देण्यात आली. टाटा एआयजी आणि बजाज एलायंज या विमा कंपनीतर्फे 24 जणांना 10 लाखांची विमा भरपाई देण्यात आली. वर्षभरात दोन्ही योजनेतून 68 कुटंबांना नुकसानभरपाई मिळाली.
दोन वेगवेगळे विमा
जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे 795 रुपयांत 20 लाखांचा अपघाती विमा उघडता येतो. अपघात झालेल्या व्यक्तीला शारीरिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही अडचण येऊ नये, यासाठी टपाल कार्यालयाने 795 रुपयांमध्ये टाटा एआयजी आणि बजाज एलायंज या दोन विमा कंपन्यांसोबत एकत्रित विमा योजना आणली आहे. हा अपघाती विमा टपाल विभागाकडून उतरविण्यात येतो. त्यात टाटा एआयजीला वार्षिक प्रीमियम 399 रुपये आणि बजाज एलायंजला 396 रुपये प्रीमियम भरावा लागतो .
हे मिळणार लाभ
* अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख
* कायमचे अपंगत्व 10 लाख
* मुलांचा शिक्षण खर्च 1 लाख प्रत्येक मुलाला
* अपघातात जखमी उपचारास दररोज 1 हजार
* ओपीडी खर्च 30 हजार रुपये
* अपघाताने पॅरालिसीस झाल्यास 10 लाख
* कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च 25 हजार
सहभागी होण्यासाठी कागदपत्रे
* आधारकार्ड
* इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत खाते
* वयोगट 18 ते 65