घटनास्थळाचे छायाचित्र 
Latest

पुणे : सेफ्टी टॅन्कमध्ये उतरलेल्या चौघांचा मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

अमृता चौगुले

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा

पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर येथील टेलिफोन एक्सचेंजसमोर हाॅटेल पॅसा पाठीमागे एका इमारतीच्या सेफ्टी टॅकची सफाई करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा दुगुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर हे वेगाने विकसित होत असलेले उपनगर असून मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण होत असून लोकसंख्येची घनता मोठी आहे. बुधवारी (दि.२) सकाळी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत परिसरात हाॅटेल पॅसा पाठीमागे असलेल्या राजेंद्र काळभोर यांच्या जय मल्हार कुंज इमारतीत सेफ्टी टाकीची साफसफाई करण्यासाठी काही सफाई कामगार उतरले. त्यात ऐकमेकांना वाचवताना एक-एक आत बुडत गेले.

अग्नीशामक पथकाची तातडीने धाव

घटनेचे गांभीर्य पाहून अग्निशमन पथकास पाचारण करण्यात आले. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे व त्यांचे कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले व मदतकार्यास वेग आला. अग्निशमन कर्मचारी व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू झाले. सकाळी दहा वाजल्यापासून हे काम चालू होते.

या घटनेत एकुण चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यांची नावे सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे (संभाजी नगर कदमवाकवस्ती, लोणी काळभोर), पद्माकर मारुती वाघमारे, कृष्णा दत्ता जाधव आणि रुपचंद नवनाथ कांबळे अशी असल्याचे कळते. यातील काही नावाची खातरजमा होणे बाकी आहे.

अग्निशमन जवानांमध्ये स्टेशन ऑफिसर विजय महाजन, मयूर गोसावी, उमेश फाळके, अक्षय नेवसे, अभिजित दराडे, मुस्ताक तडवी, ओम पाटील, विकास पालवे, चेतन खमसे, प्रशांत अडसूळ, चालक नितीन माने यांनी सहभाग घेतला. तर बाळासाहेब चव्हाण यांना साप्ताहिक सुट्टी असूनही ते घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या कर्तव्यावर धावले. या घटनेची माहिती मिळताच हडपसर विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी घटनास्थळी भेट दिली व तपास कामी सुचना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT