पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यात दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर ७० जण जखमी झाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि उपचार घेत असलेल्यांना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
कुड्डालोर जिल्ह्यातील नेल्लीकुप्पमजवळील पट्टमबक्कम येथे हा अपघात झाला. कुड्डालोर ते पाणरुती दरम्यान दोन खाजगी बस प्रवास करत होत्या. बसचा पुढील टायर फुटल्याने नियंत्रण सुटले आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुसऱ्या बसची समोरासमोर धडक झाली.