जगभरात टेलिकॉम मार्केट घटत चाललेले असताना भारताने या क्षेत्रात झकास कामगिरी बजावली आहे. म्हणजे 2022 मध्ये स्टोअर आणि दुकानांद्वारे जेवढे स्मार्टफोन, विअरेबल्स आणि टीडब्ल्यूएस मोबाईल हेडसेटस् विकले गेले, त्यांची किंमत 2021 मध्ये विकल्या गेलेल्या उत्पादनांच्या तुलनेत 36 टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे मार्केट इंटेलिजन्स फर्म 'जीएफके'च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जागतिक टेलिकॉम मार्केटमध्ये 9.7 टक्के घट नोंदवण्यात आली.
'जीएफके'च्या ताज्या अहवालानुसार यंदा टेलिकॉम मार्केट जवळपास स्थिर राहील. मात्र, काही मूल्याधारित वाढ दिसू शकते. जगभरातील बाजारांच्या तुलनेत भारतीय टेलिकॉम मार्केटने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. 2022 मध्ये भारतीय टेलिकॉम मार्केटच्या (स्मार्टफोन, विअरेबल्स आणि टीडब्ल्यूएस मोबाईल हेडसेटस्) कंपन्यांचे उत्पन्न 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे.
स्रोत ः 'जीएफके' फर्मचा ताजा अहवाल.