Latest

नागपूरसह मुंबई, वाराणसीत पकडले १९ कोटींचे सोने; ११ आरोपी अटकेत

backup backup

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बांगलादेशच्या सीमेवरून भारतात सोन्याची तस्करी करीत पुढे ते सोने मुंबई, नागपूर, वाराणसी शहरांकडे विक्रीसाठी पाठवले जायचे अशा 11 आरोपीना अटक करण्यात आली असून 19 कोटींचे सोने जप्त करण्यात आले. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जमीन आणि रेल्वे मार्गांद्वारे परदेशातून आणलेल्या सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी वाराणसी, नागपूर आणि मुंबई या तीन वेगवेगळ्या ठिकाणी डीआरआयच्या पथकामार्फत केल्या गेलेल्या कारवाईत 31.7 किलो सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत सुमारे 19 कोटी रुपये आहे.

नागपूर डीआरआयच्या पथकाने सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना कोलकाताहून निघालेल्या रेल्वेमधून नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर उतरताना पकडले. त्यांच्याकडून 8.5 किलो वजनाचे विदेशी चिन्हांकित सोने जप्त करण्यात आले. या तस्करांच्या चौकशीनंतर डीआरआयच्या पथकाने तस्करीच्या सोन्याच्या दोन खरेदीदारांची ओळख पटवून त्यांना सुद्धा ताब्यात घेतले. दरम्यान,वाराणसी येथील डीआरआयच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर 3 तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर आणि जंगलातील शोध मोहिमेनंतर वाहनासह दोन आरोपी पकडले. यश त्या दोघांकडून आणि कारच्या हँडब्रेकच्या खाली बनवलेल्या पोकळीतून सुमारे 18.2 किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले.

आणखी एका कारवाईत वाराणसीहून रेल्वेने सोने घेऊन गेलेल्या पाच आरोपींना शोधण्यात मुंबईच्या पथकाला यश आले. या पथकाने त्यांच्याकडून 4.9 किलोग्रॅम सोने जप्त केले. यासंदर्भात डीआरआयने मुंबईत पाच, वाराणसीत दोन आणि नागपुरमध्ये चार अशा एकूण 11 जणांना अटक केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT