

पुढारी ऑनलाइन डेस्क : Adani Group : अदानी समूहाने गेल्या महिन्यात इस्रायलचे हैफा हे अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेले बंदर विकत घेतले. त्यावरून वेगवेगळ्या स्तरातून आरोप आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, इस्रायलच्या या निर्णयाचा त्यांचे राजदूत नाओर गिलॉन यांनी बचाव केला आहे. यावेळी त्यांनी अदानी समूहावर विश्वास व्यक्त केला. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन बुधवारी म्हणाले, Adani Group आवश्यकतेनुसार या बंदराला बदलण्याची आणि या प्रदेशात दोन्ही देशांमधील व्यापार वाढवण्याची क्षमता आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमधील विश्वासाची पातळीही दिसून येते, असे गिलॉन म्हणाले.
बंदर हाताळण्याच्या Adani Group अदानी समूहाच्या क्षमतेवर यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला. "आमच्या दृष्टिकोनातून ही एक अतिशय महत्त्वाची वाटचाल होती कारण हैफा बंदर ही आमची धोरणात्मक मालमत्ता आहे. अदानी समूहाकडे हैफा बंदराला आवश्यकतेनुसार सर्व गरजा पूर्ण करून विकसित करून उत्कृष्ट बंदर बनविण्याची क्षमता आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसने गौतम अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक असल्यामुळे समूहाला पसंती मिळाली, असा आरोप केला होता. याचे उत्तर देताना गिलॉन म्हणाले, "आमच्याकडे टाटासह भारतीय कंपन्यांसोबत सुमारे 80 संयुक्त उपक्रम आहेत. बंदरे हा अदानी समूहाचा मुख्य व्यवसाय आहे. मला पोर्ट्स खूप चांगले काम करताना दिसतात. अदानी समूह इस्रायलमध्ये आणखी प्रकल्पांच्या शोधात आहे आणि मला आशा आहे की ते यशस्वी होतील."
इस्रायलचे राजदूत गिलॉन यांनी माध्यमांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना असेही सांगितले की, भारत आणि इस्रायल दोन्ही प्रस्तावित मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देण्यास उत्सुक आहेत कारण यामुळे एकूण द्विपक्षीय व्यापार संबंधांना आणखी चालना मिळू शकते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :