

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ( Priyanka Chopra ) पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत काही दिवसांपूर्वी भारतात आली आहे. यानंतर प्रियांकाने फॅशन वीक आणि निता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटनास दिमाखात हजेरी लावली. याशिवाय ती भारतात तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट 'सिटाडेल' चे प्रमोशन करण्यात बिझी आहे. याच दरम्यान प्रियांका पतीसोबत ऑटोरिक्षातून रात्री मुंबईत सवारी केली आहे.
कोटयावधींची मालकीण आणि आलिशान कारमधून फिरणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ( Priyanka Chopra ) नुकतेच पतीसोबत मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट झाली आहे. यावेळी खास करून प्रियांने पतीसोबत एका ऑटोरिक्षातून रात्री मुंबईची सवारी केली. यावेळचे काही फोटो प्रियांकाने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत प्रियांका मल्टी कलरच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसली. तर निक ब्ल्यू रंगाच्या सूटमध्ये एकदम हॅडसम दिसला.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'डेट नाइट अॅन्ड ए, हमेशा निक जोनससोबत.' असे लिहिले आहेत. तर यासोबत प्रियांकाने एक रिक्षाचा इमोजीदेखील शेअर केला आहे. प्रियांका एका ऑटोरिक्षातून खाली उतरताना हे फोटोशूट केले आहे. तर प्रियांका आणि निकसोबत ऑटोरिक्षाचा ड्रायव्हरचीही चर्चा रंगू लागली आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.
प्रियांका आणि निक दोघांच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. हे फोटो पाहून चाहत्यांनी प्रियांका एक सेलेब्रिटी असून रिक्षातून कशी काय फिरते? यामुळे चाहते अवाक् झाले आहेत. या फोटोला आतापर्यत ४० लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.
हेही वाचा :
(video : viralbhayani istagram वरून साभार)