

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'छोटी सरदारनी', 'महाभारत' फेम अभिनेत्री मानसी शर्माच्या ( Mansi Sharma ) घरी नव्या पाहूण्याचे आगमन झाले आहे. नुकतेच मानसी दुसऱ्यांदा आई बनली असून एका गोंडस बाळाला (मुलगी) जन्म दिला आहे. याआधी मानसीने गेल्या काही महिन्यापूर्वी बेबीबंप प्लॉन्ट करत याबाबतची माहिती दिली होती.
अभिनेत्री मानसी शर्माने ( Mansi Sharma ) हंसराज हंस याचा मुलगा युवराज हंस याच्याशी लग्न केलं होते. याआधी दोघांना हदय नावाचा एका मुलगा आहे. दरम्यान मानसीने गेल्या मे महिन्यात दुसऱ्यांदा आई होणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. आता नुकतेच मानसीने एक फोटो शेअर करत गुडन्यूज दिली आहे. या फोटोत लहान मुलांच्या पायांतील बुट आणि इतर सजावटीच्या गोष्टी दिसत आहे. तर ठळक अक्षरात 'इटस् अ गर्ल' असे लिहिले आहे. यावरून मानसी दुसऱ्यांदा आई बनल्याची माहिती समोर येत आहे.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला. मानसी आणि युवराज यांनी २१ फेब्रुवारी २०१९ मध्ये लग्न बंधनात अडकले होते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास मानसीने 'पवित्र रिश्ता', 'देवों के देव महादेव', 'छोटी सरदारनी' आणि 'महाभारत' यासारख्या अनेक मालिकत काम केलं आहे.
हेही वाचा :