

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री काजोल दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रात देवीची पूजा करताना दिसली. काजोल नवरात्रोत्सव तिच्या नातेवाईकांसमवेत हा उत्सव साजरा करत असते. यंदाही तिचा उत्साह पाहायला मिळाला. काजोलने दुर्गापूजेवेळी केलेला लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. मात्र या कार्यक्रमात माेबाईल फाेनमध्ये गुंग झालेली काजोल स्टेजवरून खाली पडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. (Actress Kajol)
दुर्गा पूजा करताना अभिनेत्री काजोल स्टेजवर होती. मात्र, तिचे सर्व लक्ष तिच्या फोनवर होते. त्यानंतर स्टेजच्या कडेला पोहोचताच ती अचानक खाली पडली. मात्र, काजोल अडखळताच खाली उभ्या असलेल्या लोकांनी तिला आधार दिला आणि तिला पडण्यापासून वाचवले. या घटनेमुळे काजोलच्या पायाला दुखापत झाली आहे. यादरम्यान तिचा फोनही खाली पडला होता. तिचा मुलगा युगही आईची काळजी घेताना दिसत होता. (Actress Kajol)
काजोलने कुटुंबासह दुर्गा पूजेला हजेरी लावली. दुर्गा पूजा करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये काजोलने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. (Actress Kajol)
दरवर्षी अभिनेत्री काजोल मुंबईतील दुर्गा पूजा उत्सवात भाग घेते. पश्चिम उपनगरातील ही सर्वात मोठा उत्सवांपैकी एक आहे. ही पूजा मुखर्जी परिवाराकडून आयोजित करण्यात आली होती. (Actress Kajol)