Hina Khan : मशिदीतील फोटोशूटमुळे हिना ट्रोल; प्रवास अत्यंत उत्साही अन्…

Hina Khan
Hina Khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान ( Hina Khan ) सध्या उमराहसाठी मक्का-मदीनाला गेली आहे. तिथून ती नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्याच्यासाठी शेअर करत आहे. आता हिनाने मदिना येथील मशिदीतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे.

अभिनेत्री हिना खानने ( Hina Khan ) नुकतेच मदिना येथील मशिदीतील काही फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हिना इथे तिच्या आई आणि भावासोबत आहे. या दरम्यानचा सुखद प्रवासाचे वर्णनदेखील तिने केले आहे. फोटोत हिना लाईट पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये मशिदीच्या आजूबाजूला फोटोला पोझ देताना दिसली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Ibaadat ka rukh makka hai, Mohabbat ka rukh madina hai..' असे लिहिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे.

यात नेटकऱ्यांनी 'धार्मिक स्थळाचा आदर केला पाहिजे', 'आजकाल लोक मक्का, मदिना, वैष्णोदेवी या धार्मिक स्थळी पूजेसाठी जात नाहीत तर फोटोशूटसाठी जातात', 'बदलायचं असेल तर सना खानसारखं बदलावे', 'तिच्याकडून काहीतरी शिका', 'अल्लाहला फक्त दिखावा केलेला आवडत नाही'. यासारख्या अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर दरम्यान हिनाने सोशल मीडियावरील कमेंट्सचा सेक्शन बॉक्स बंद केला आहे. या फोटोला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

दरम्यान, हिनाने प्रवास वर्णन करताना 'रमजानच्या पवित्र महिन्यात उमराहसाठी आधी मदिना आणि नंतर मक्काला जावे हे मला समजले नाही. या प्रवास सुखकर होता. मला खूपच आनंद आणि उत्साह झाला आहे. काही ठिकाणची परिस्थिती सोडली तर इतर ठिकाणी वातावरण प्रसन्न होते. मला तीन ठिकाणी जायचे होते. मात्र, मी फक्त मक्का आणि मदिनालाच गेले. अजून एका ठिकाणी जायचे राहून गेलं…' असे तिने म्हटलं आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hina Khan (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hina Khan (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hina Khan (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hina Khan (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hina Khan (@realhinakhan)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news