युवकाची डोक्‍यात गोळी घालून हत्या
युवकाची डोक्‍यात गोळी घालून हत्या

साताऱा हादरला : युवकाची डोक्‍यात गोळी घालून हत्या; वाढे फाट्यावरील घटना

Published on

सातारा; पुढारी वृत्‍तसेवा सातारा शहरानजीक असलेल्या महामार्गावरील वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेल परिसरात गोळीबार करत एकाची हत्या करण्यात आल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. हत्या झालेला युवक शहरातील शुक्रवार पेठेतील असल्याची माहिती समोर येत आहे. युवकाच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गोळीबारानंतर मारेकरी फरार झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील महामार्गावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्याच्या थरारनंतर परिसरात खळबळ उडाली. वाढे फाट्यानजीक पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यावसाय चालतो. याच परिसरात हा गोळीबार झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या गोळीबारामुळे हॉटेल व्यावसायिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण आहे. सदरचा मृत्यू झालेला युवक सातारा शहरातील असून, त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबियांनी, मित्रांनी धाव घेतली आहे. सातारा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news