

मुंबई; पुढारी ऑनलाईन
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८२ वा वाढदिवस राज्यात साजरा होत आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनीही संबोधन केले. या वेळी कवी मोतीलाल राठोड यांचा उल्लेख करत त्यांच्या 'पाथरवट' या कवितेचा उल्लेख करत तशा कविता ऐकून रात्री झोप येत नसल्याचे मत व्यक्त केले. हे ऐकून आपणच गुन्हेगार आहोत, असेही वाटत असल्याच पवारांनी म्हटलं.
समाजकारण करताना या समाजाच्या यातना दूर करण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करणार याचा विचार करता येतो, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी शरद पवार म्हणाले की, मी अनेकवेळा गरीब समाजातून आलेल्या तरुणांसोबत राहीलो आहे. त्यांच्या मनात किती अस्वस्थता आहे. ते अन्यायाबाबत काय विचार करत असतील. आपण समाजकारण करणार असू तर त्यांच्या यातना दूर करण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करणार आहोत याचा विचार या निमित्ताने मनात येतो. असंही पवारांनी यावेळी म्हटलं.
शरद पवार म्हणाले, 12 डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. माझा वाढदिवस आहे म्हणून नाही, तर 12 डिसेंबर हा माझ्या आईचा वाढदिवस आहे. गंमत अशी आहे माझ्या घरात 12 डिसेंबरचे तीन-चार वाढदिवस आहेत. जयंत, विभावरी, माझा एक पुतण्या, माझ्या बहिणीची मुलगी तिचा वाढदिवसही 12 डिसेंबर आहे. त्यात आई 12 डिसेंबरची. मी 12 डिसेंबरचा आणि पणतू 13 डिसेंबरचा. काही योग असतो, असेही ते म्हणाले.
हेही वाचलत का?