

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या अंतरवाली सराटी गावातील शिष्टमंडळ काल (शुक्रवार) रात्री अर्जुन खोतकर यांच्या समवेत मुबंईत दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. यावेळी मराठावाड्यासह महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाण पत्र मिळावं या मागणीसाठी शिष्टमंडळाने आपली भूमीका मांडत आरक्षणाची मागणी केली. या वेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांना निजामकालीन कागदपत्रे संपूर्द केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर शिष्टमंडळ हे अंतरवाली सराटी गावात दाखल झाले असून, व्यासपीठावर गेल्या 20 मिनिटांपासून शिष्ट मंडळातील सदस्य, किराण तारख, पांडुरंग तारखं, किशोर चव्हाण यांची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरु आहे. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील आपली भूमीका स्पष्ट करणार आहेत.
काही क्षणात या ठिकाणी शासनाचे शिष्टमंडळ दाखल होणार असल्याची माहिती ही अधिकृत सूत्राकडून दिली जात आहे. यात गिरीश महाजन, अर्जुन खोतकर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी असणार असल्याची माहिती समोर येत आहे. बैठकीत मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाचा बंद लिफाफा घेऊन ते व्यासपीठावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा बंद लिफाफा फोडल्या नंतर जरांगे आपली भुमिका स्पष्ट करतील असं देखील बोललं जात आहे. अद्याप तरी मनोज जरांगे पाटील आपल्या भुमिकेवर ठाम असून, त्यांची आपल्या सहकार्याच्या शिष्ट मंडळासोबत चर्चा सुरु आहे. चार दिवसांच्या अल्टीमेटमचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे मनोज जरांगे पाटील काय? निर्णय घेता हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
हेही वाचा :