

चेहरा जास्त सुजल्यासारखा वाटू लागल्यास किंवा डोळे बारीक दिसू लागल्यास चेहर्यावर सूज येण्याची ही लक्षणे काळजीचे कारण ठरू शकतात. ही सूज काही अॅलर्जीमुळेही येऊ शकते. काही तज्ज्ञांच्या मते शरीरात होणारे अंतर्गत बदल आणि बाह्य कारणांमुळे चेहर्यावर सूज येऊ शकते. अनेक वेळा चुकीच्या कॉस्मॅटिकचा वापर, एखाद्या खाद्यपदार्थांचे वा औषधाचे सेवन केल्यानंतर आणि कधी अॅलर्जी निर्माण करणारे घटक श्वासाद्वारे शरीरात गेल्यास असे होऊ शकते. अनेकवेळा ओरल कॅव्हिटी वा दातांशी निगडित समस्यांमुळेही चेहर्यावर सूज येऊ शकते.
चेहर्याच्या ऊतीत फ्लुईड म्हणजेच पाणी गोळा झाल्यामुळेच चेहरा सुजल्यासारखा वाटतो. याला शास्त्रीय भाषेत 'फेशियल एडेमा' म्हणतात. चेहर्यावर सूज येण्याची कारणे जाणून घेण्यासाठी रुग्णाने त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. बर्फाचा छोटासा तुकडा चेहर्यावर फिरवल्याने चेहर्यावरील सूज कमी होऊ शकते. मुलायम टॉवेल वा एखाद्या कपड्यात बर्फाचा तुकडा ठेवून सुजलेल्या जागी दिवसातून चार ते पाच वेळा हळूहळू लावा. हळद व चंदन चेहर्यावरील सूज वा वेदना दूर करतात.
रक्तचंदन वा हळदीच्या पुडीपासून तयार केलेला लेप बराच परिणामकारक ठरू शकतो. वाळल्यानंतर तो कोमट पाण्याने धुवून टाका. कमी मीठ अधिक सोडियम म्हणजेच जास्त मीठ असलेला आहार घेतल्यानेही चेहर्यावर सूज येते. त्यासाठी जास्त मीठ असलेले भोजन टाळा. उंच उशी झोपताना वापरा. तज्ज्ञांच्या मते जर डोके उंचवट्यावर असल्यास त्वचेमध्ये पाणी गोळा होत नाही आणि परिणामी सूज कमी होते.