रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. 

कॅन्सरसह अनेक आजारांमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पुतीन यांना स्पष्ट दिसणे कठीण बनले आहे. 

तीव्र डोकेदुखीसह त्यांची जीभही बधिर झाली आहे. 

डॉक्टरांनी सध्या पुतीन यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 

जगभरातील माध्यमे त्यांच्या आरोग्याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत.

त्यामुळेच संपूर्ण रशियात त्यांच्या आरोग्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहेत.