उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे तर  टॅन कमी करण्यासाठी करा हे उपाय...

कामानिमित्त बाहेर पडावे लागल्यास त्वचा झाकून राहील असे अंगभर कपडे घालूनच बाहेर पडावे.  

टोपीमुळे तुमच्या डोक्याच्या संरक्षणाबरोबरच उन्हामुळे चेहरा काळवंडला जात नाही..

सनग्लासेस घालूनच बाहेर पडावे त्यामुळे उन्हाच्या किरणांचा प्रभाव डोळ्यांवर होत नाही आणि डोळ्याचे संरक्षण होते..

 ओठ काळे पडू नयेत यासाठी ओठांवर नेहमी लिपबाम लावावा, ज्यामुळे उन्हापासून ओठांचे संरक्षण होते.

सन स्क्रीन SPF 30-50 असावे. शरीराच्या ओपन राहणाऱ्या भागांवर लावावे. सन स्क्रीन लावल्याने उन्हामुळे चेहरा काळवंडला जात नाही..

उन्हाळ्यात अधिक पाणी पिणे गरजेचे असते. पाणी पिल्याने तुमची त्वचा हायड्रेटेड राहते.