ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवारमध्ये गुढी पाडवा साजरा होणार

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत पारंपरिक पद्धतीने साजरा होणार गुढीपाडवा

मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे.

ठरलं तर मग मध्ये अर्जुन आणि सायलीचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहेत.

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील मोरे कुटुंबात दरवर्षी उत्साहात गुढी उभारली जाते.

गुढीच्या पुजेची सर्व तयारी पश्या करत असे.

यावर्षी मात्र पश्या नाही त्यामुळे पूजा होणार की नाही अश्या विचारत असताना पश्या गुपचूप पुजेची तयारी करुन जातो.

त्यामुळे सरु वहिनीला खात्री आहे की पश्या आसपासच आहे.

यंदा पश्यासाठी मोरे कुटुंब एकत्र येऊन गुढी उभारणार आहेत.

सुख म्हणजे नक्की काय असतं - जयदीप गौरीसाठी यंदाचा गुढीपाडवा खास असणार आहे.

दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या लक्ष्मीचं आगमन झालं आहे.

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतही कानेटकर कुटुंबाने आनंदाची गुढी उभारली आहे.