इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळवला गेला. 

सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच 19 जूनला कांगारूंचा फिरकीपटू नॅथन लायने इतिहास रचला. 

लायन आता WTC च्या इतिहासात 150 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. 

त्याने आतापर्यंत 35 कसोटींमध्ये 152 विकेट घेण्याची किमया केली आहे. 

दुस-या क्रमांकावर इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (141), तर तिस-या स्थानी भारताचा आर अश्विन (132) आहे.

35 वर्षीय लायनने ॲशेस 2023 च्या पहिल्या कसोटीत चूक मारा केला. त्याने दोन्ही डावात 4-4 विकेट घेतल्या.