नारळ पाणी गुणकारी आहे; पण त्‍याचे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत.

नारळ पाण्‍यात पोटॅशिअम १५ टक्के असते. त्‍यामुळे काहींना पोट गच्‍च झाल्‍यासारखं वाटतं.

एका संशोधनानुसार, काहींना नारळ पाण्‍याची एलर्जी असू शकते.

नारळ पाण्‍यात पोटॅशिअम अधिक प्रमाणात असते. नारळ पाणी अतिसेवनाने शरीरातील पोटॅशिअमचा स्‍तर वाढतो. तो आरोग्‍यासाठी हानीकारक ठरु शकतो.

उपाशी पोटी नारळ पाणी पिल्‍याने उच्‍च रक्‍तदाब  कमी होण्‍यास मदत होते. डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानेच नारळ पाण्‍याचे सेवन करावे.