IPL च्या तिसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सने पराभव केला. 

LSG ने 50 धावांनी मोठा विजय नोंदवला. 

सामन्यात LSG संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 193 धावा केल्या. 

प्रत्युत्तरात दिल्ली संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 143 धावा करता आल्या.

दिल्लीचा हा पराभव सामन्याच्या 6 व्या षटकात निश्चित झाला होता. 

या षटकात दिल्लीच्या खलीलने LSG च्या काइल मेयर्सचा सोपा झेल सोडला. 

यावेळी मेयर्सचा 15 चेंडूत 14 धावांवर खेळत होता.

यानंतर, LSG च्या मेयर्सने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. 

मेयर्सने 38 चेंडूत 7 षटकार, 2 चौकारांच्या मदतीने 73 धावांची तुफानी खेळी केली. 

वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने चांगली सुरुवात केली. 

वॉर्नरने 56 धावांची इनिंग खेळली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 

लखनौच्या विजयाचा नायक मार्क वुड ठरला. त्याने 5 विकेट घेत दिल्लीचे कंबरडे मोडले. 

विजयासह लखनौने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले.