पावसाच्या सरींनी वारकर्‍यांचे स्वागत; वारकरीभूषण पुरस्काराने सन्मान | पुढारी

पावसाच्या सरींनी वारकर्‍यांचे स्वागत; वारकरीभूषण पुरस्काराने सन्मान

धनकवडी : गुरुवारी पडलेल्या पावसाच्या सरींनी वारकर्‍यांचे स्वागत केले. तसेच, ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांची पालखी पुण्यनगरीत विसावली असून, झालेल्या पावसाने सर्व वारकरी धनकवडी, आंबेगाव पठार, बालाजीनगर, भारती विद्यापीठ परिसर टाळ-मृदंग यांच्या आणि विठ्ठल… विठ्ठल, जय हरी विठ्ठल… या गजरात दुमदुमून गेला आहे. दक्षिण उपनगरातील धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसर, या उपनगरांत विविध दिंड्यांचे काल आगमन झाले.

स्वागत करण्यासाठी समाजसेवी संस्थांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या प्रेरणेने संगीताचार्य गणेश महाराज भगत यांच्या मार्गदर्शनाने दिव्यध्यास चॅरिटेबल ट्रस्टचे सचिन डिंबळे मित्रपरिवार, माऊली संगीत विद्यालय गुरुकुल यांच्यावतीने प्रतिवर्षी दिंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

वारकरीभूषण पुरस्कार
आदर्श पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांचा आद्यवार्ताहर महर्षी नारद मुनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वर्षी ज्ञानोबा माउली महाराज काशीद व साहेबराव महाराज भिलारे या निष्ठावंत वारकर्‍यांना वारकरीभूषण पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी भजन, कीर्तन, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

हेही वाचा

नगर : निवृतीनाथ महाराज दिंडीमुळे भुसार, भाजीपाला बाजार बंद

उंडवडी सुपे येथे जलशुद्धीकरण मोहीम सुरू; पालखी सोहळ्याची तयारी पूर्णत्वास

जेजुरी नवीन पालखीतळाला अधिकार्‍यांची भेट

Back to top button