श्वान ‘विराट’ माउलींच्या चरणी नतमस्तक | पुढारी

श्वान ‘विराट’ माउलींच्या चरणी नतमस्तक

पुणेः पुढारी वृत्तसेवा: शहर पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकाचा (बीडीडीएस) श्वान विराट गुरुवारी माउलींच्या चरणी नतमस्तक झाला. संतश्रेष्ठ माउलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी आहे. त्या वेळी विराटने माउलींचे दर्शन घेतले. विराट आपल्या सहा श्वान साथीदारांसोबत पालखी सोहळ्यात कर्तव्यावर आहे.

पालखी सोहळ्यात बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे दोन पोलिस निरीक्षक, 7 सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 62 पोलिस अंमलदार बंदोबस्तावर आहेत. त्यांच्यावर पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. पालखी मार्ग, मुक्कामांची व विसाव्यांच्या ठिकाणांची तपासणी करण्याचे काम त्यांच्या पथकांकडे आहे.

हेही वाचा

वारकर्‍यांसाठी खुद्द पोलिस आयुक्त बनले ‘सेवेकरी’ सहकुटुंब

राहुरीच्या पूर्व भागात पावसाची हजेरी

पिंपरी : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर

Back to top button