दर्शनाला आलेले भाविक पावसातही न्हाले; आस माउलींच्या दर्शनाची | पुढारी

दर्शनाला आलेले भाविक पावसातही न्हाले; आस माउलींच्या दर्शनाची

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शहरातील पेठांमध्ये पालख्यांच्या दर्शनासाठी आलेले पुणेकर भाविक आणि वारकरी गुरुवारी (दि.23) रिमझिम पावसात न्हाऊन निघाले. एकीकडे दुपारीच्या सुमारास पावसाने हजेरी लावून भाविकांची धांदल उडविण्याचा प्रयत्न केला, पण दुसरीकडे भाविकांचा पालखी दर्शनाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यामुळे पाऊस बरसला तरी वारकर्‍यांचा उत्साह काही केल्या कमी झाल्याचे दिसले नाही. आळंदी, देहू येथून निघालेल्या पालख्या गुरुवारी पुणे मुक्कामी होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पुण्यातआलेल्या वारकर्‍यांच्या गर्दीने मध्यवस्तीचा परिसर गजबजलेला होता.

पेठांना आले यात्रेचे स्वरूप…
मध्यवस्तीसह उपनगर भागातील भाविकांनीदेखील पालख्यांच्या दर्शनासाठी नाना पेठ आणि भवानी पेठेत आवर्जून हजेरी लावली होती. अनेक जण सहकुटुंब पालख्यांच्या दर्शनासाठी आलेले दिसले. ठिकठिकाणी खेळण्यांचे आणि विविध वस्तूंचे स्टॉल लागले होते. खाद्यपदार्थांचे स्टॉलही यावेळी दिसले. या स्टॉलवर नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच लहानग्यांकरिता पेठांमध्ये खेळणी उभी करण्यात आली होती. त्या खेळण्यांचा आनंद लुटताना बच्चेकंपनी पाहायला मिळाली. त्यामुळे या दोन्ही पेठांसह आजूबाजूच्या पेठांना यात्रेचे स्वरूप आले होते.

हेही वाचा

सेवासदन बघून मकंरद अनासपुरे भारावून गेले

नाशिक : एकतर्फी प्रेमातून उंच डोंगरावरुन दरीत उडी घेत युवकाची आत्महत्या

अकोले : पाण्यासाठी ब्राह्मणवाडा ग्रामस्थ आक्रमक

Back to top button