सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यातील मुक्कामस्थळांची पाहणी | पुढारी

सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यातील मुक्कामस्थळांची पाहणी

परिंचे : पुढारी वृत्तसेवा: संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यातील मुक्काम व विसावास्थळांची पाहणी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यासह अनेक अधिकार्‍यांच्या पथकाने केली. या वेळी येथे असणार्‍या त्रुटी सोडविण्यात येणार असून, सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, सोहळाप्रमुख त्रिगुण महाराज गोसावी आदी या प्रसंगी उपस्थित होते. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी पालखी सोहळा होत असल्याने भाविक व गावकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पालखीचा पहिला मुक्काम पांगारे गावात असून, ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी बैठकव्यवस्था, परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय, विद्युतरोषणाई आदी व्यवस्था करण्यात आल्याचे ग्रामसेवक परशुराम राऊत यांनी सांगितले. मुक्कामाच्या ठिकाणी 100 फिरते शौचालय, वारकर्‍यांची राहण्याची व्यवस्था, प्रशासकीय अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र कक्ष तसेच पिण्याच्या पाण्याचे आरोग्य विभागाने ठरवून दिलेले ठिकाण आदी पाहणी केल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले.

या प्रसंगी संतोष काकडे, निष्णाई देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मधुकर काकडे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्याचे सोहळाप्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांनी सांगितले. परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पाच ठिकाणी आरोग्य पथके, रुग्णवाहिका, पाणी शुद्धीकरण, हॉटेल तपासणी, पाण्याचे स्रोत तपासणी करून शुध्दीकरण करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित कोलते यांनी सांगितले. या वेळी शिवसेना नेते समीर जाधव, ग्रामसेवक शशांक सावंत, सोसायटी अध्यक्ष नंदकुमार जाधव, उपाध्यक्ष सुभाष नवले, ग्रामपंचायत सदस्य गणेश पारखी, प्रवीण जाधव, पालखी चोपदार मनोहर रणवरे, सिद्धेश शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

रोटी घाट झालाय सोपा; पण चढ कायम

बीड : पंकजा मुंडेंनी आष्टीतून फुंकले जि. प. निवडणुकीचे रणशिंग

मुलीवर अत्याचार, आरोपीस शिक्षा

Back to top button