वैष्णवांच्या स्वागतासाठी झेंडेवाडी सज्ज | पुढारी

वैष्णवांच्या स्वागतासाठी झेंडेवाडी सज्ज

दिवे : पुढारी वृत्तसेवा: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यातील मुक्काम संपल्यानंतर आपले बंधू संत सोपानकाका यांच्या भेटीच्या ओढीने सासवडनगरीकडे येत असतो. या सोहळ्याच्या स्वागतासाठी पुरंदरकर सज्ज झाले आहेत. हवेली तालुक्यातील वडकीकरांचा निरोप घेऊन अवघड अशा दिवे घाटाची चढण पार करून पुरंदरमध्ये या पालखी सोहळ्याचा पहिला विसावा असतो. हा विसावा झेंडेवाडी येथे असतो. दोन वर्षांच्या खंडानंतर वैष्णवांचे स्वागत करण्यासाठी पुरंदरकर सज्ज झाले आहेत.

झेंडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी विसाव्याची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे, तसेच स्वागत कक्षदेखील उभारण्यात आला आहे. यावर गावकर्‍यांचे बारीक लक्ष आहे. वैष्णवांच्या स्वागतात कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. या कामाची पाहणी ग्रामपंचायत सदस्य अमर झेंडे, शरद झेंडे, अजित गोळे, ग्रामविकास अधिकारी रश्मी सांगळे, संदीप झेंडे, पोलिस पाटील सारिका झेंडे, गणेश झेंडे, सागर जाधव व ग्रामस्थांनी केली.

हेही वाचा

रोटी घाट झालाय सोपा; पण चढ कायम

बीड : पंकजा मुंडेंनी आष्टीतून फुंकले जि. प. निवडणुकीचे रणशिंग

हिंगोली : जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची वाणवा

Back to top button