वासुदेव आला हो...वासुदेव आला... वारीच्या वाटेवर जनजागृती | पुढारी

वासुदेव आला हो...वासुदेव आला... वारीच्या वाटेवर जनजागृती

पुणे : पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल सांस्कृतिक परंपरा म्हणजे वासुदेव…याच परंपरेला अधोरेखित करत हिंगोलीतील औंढा नागनाथ येथील वासुदेव गल्लीतील वासुदेव समाज सेवा संघाचे काही कलावंत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत सहभागी झाले…गाणी म्हणत त्या वासुदेवांनी सामाजिक जागृतीचा संदेश दिला. पालखीच्या दिंडीच्या पुढे या वासुदेवांचा एक गट दरवर्षी सहभागी होतो. यंदाही त्यांनी ही परंपरा जपत वासुदेव या सांस्कृतिक परंपरेचा लोकांना परिचय करून दिला.

पालखी सोहळ्यात 10 कलावंत सहभागी झाले. पालखीच्या दिंडीच्या पुढे चालण्याचा मान आम्हाला असतो, असे सांगतानात उत्तम केंद्रे यांनी दोन वर्षांनंतर सोहळ्यात पायी चालण्याचा आनंद काही औरच असल्याचे म्हटले आहे. उत्तम केंद्रे म्हणाले, ‘दोन वर्षे पालखी सोहळा न झाल्याने मनात एक रुखरुख होती, पण यावर्षी आम्ही मोठ्या ऊर्जेने पंढरपूरला निघालो आहोत. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कला आम्ही जोपासत असून, वारीतून ती लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. वासुदेव परंपरेशी लोकांची ओळख व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे.’

हेही वाचा

पिंपरी :‘आरटीई’अंतर्गत 329 विद्यार्थी अद्याप वेटिंगवर

गोवा : फोंडा येथील पोस्टात 60 हजारांची अफरातफर

गोवा : राज्यातील वीजदरात वाढ; घरगुती वापर प्रति युनिट 5 पैशांनी महाग

Back to top button