‘आयटी’त घेऊ विठ्ठलाचे नाम... | पुढारी

‘आयटी’त घेऊ विठ्ठलाचे नाम...

पुणे : एरवी कामात व्यग्र असणारे आठ तरुण वारकरी होऊन पालखीत सहभागी झाले आहेत. एक उत्साह अन् ऊर्जा घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत त्यांनी आळंदी ते पुणे, असा प्रवास केला. दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळ्यात तरुणांचा सहभागही पाहायला मिळतोय. प्राधान्याने आयटीतील नोकरदार तरुण पालखीत सहभाग झाले. या पालखीच्या भक्तिरंगात तेही रंगून गेले.

बाणेर येथील रोहन लेहर सोसायटीत राहणार्‍या आणि आयटी कंपनीत काम करणार्‍या या तरुणांनी आठवडाभरापूर्वी पालखीत सहभागी होण्याचे नियोजन केले. त्यानुसार आळंदी ते पुणे या मार्गावर पायी वारी केली. पहाटे चार वाजता त्यांनी आळंदीहून पुण्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली अन् दुपारी 2 च्या सुमारास ते पुण्यात पोहोचले. स्नेहल येवले, दयानंद गोटे, दीपक कौलगे, अक्षय नाईक, प्रमोद सपकाळ, श्रीकांत मेटकर आणि मनीष अरगडे हे तरुण पालखीत सहभागी झाले.

मी आळंदी ते पुणे अशी पायी वारी बर्‍याचदा केली आहे. त्यामुळे मी माझ्या या आयटीतील मित्रांनाही वारीत सहभागी होण्यास प्रेरित केले आणि आम्ही त्यादृष्टीने नियोजन केले. वारीत सहभागी होऊन खूप आनंद झाला अन् नवी ऊर्जा मिळाली.

                     – दीपक कौलगे, आयटी अभियंता

हेही वाचा

भाजपात ताकद असेल तर निवडणूका घ्या; आमदार नितीन देशमुख यांचे आव्हान

गोवा : राज्यातील वीजदरात वाढ; घरगुती वापर प्रति युनिट 5 पैशांनी महाग

नगर : काष्टी ग्रामपंचायतीमध्ये पाचपुतेंचा शब्द डावलला

 

Back to top button