‘या’ कासवाचे वय 192 वर्षे!

जगातील सर्वात जुना जिवंत प्राणी
world's oldest living turtle
जगातील सर्वात जुना जिवंत कासव.Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : कासवं दीर्घायुष्यी असतात, हे आपल्याला माहिती आहे; मात्र त्याचे सर्वात ठळक आणि मानवासमोर असलेले उदाहरण म्हणजे ‘जोनाथन’ नावाचे कासव. जोनाथन हा सेशेल्सचा विशाल कासव आहे, जो जगातील सर्वात जुना जिवंत प्राणी आहे. जगातील सर्वात जुना प्राणी म्हणून जोनाथनचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. त्याचा जन्म 1832 मध्ये झाला होता आणि 2024 मध्ये तो 192 वर्षांचा होणार आहे.

सर्वात जुने जिवंत प्राणी म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

जोनाथन दक्षिण अटलांटिक महासागरात स्थित ब्रिटिश ओव्हरसीज टेरिटरीमधील सेंट हेलेना बेटावर राहतो. जोनाथनला 1882 मध्ये सेशेल्समधून सेंट हेलेना येथे आणण्यात आले, तेव्हा तो 50 वर्षांचा होता. त्यावेळी त्यास गव्हर्नर सर विल्यम ग्रे-विल्सन यांना भेट म्हणून देण्यात आले होते. या कासवाने आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत, जसे की पहिले आणि दुसरे महायुद्ध, आणि त्याने सात ब्रिटिश सम्राट आणि 39 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पाहिले आहे. मात्र, सध्या मोतीबिंदूमुळे जोनाथन आंधळा झाला असून, त्याची वासाची जाणीवही हरवली आहे. इतके वय झालेले असूनही, जोनाथन सक्रिय आहे आणि तो त्याच्या घेरात हळूहळू चालतो. जोनाथन त्याच्या वयाशी संबंधित अंधत्वामुळे गवत चरू शकत नाही. त्यामुळे त्याला गाजर, कोबीचा पाला, काकडी असा विशेष आहार दिला जातो. जोनाथनचे बहुतेक आयुष्य गव्हर्नरच्या घरात गेले आहे, जिथे त्याने इतर अनेक कासवांसोबत वेळ घालवला आहे. 1882 ते 1886 दरम्यान घेतलेल्या जुन्या छायाचित्रांमधून जोनाथनचे वय लक्षात येते. 2022 मध्ये सर्वात जुने जिवंत प्राणी म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे अधिकृतपणे त्याची नोंदणी केली गेली. तेव्हापासून आजतागायत या कासवाचा विक्रम अबाधित आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news