

न्यूयॉर्क : सूर्यमालेत ग्रहांची निर्मिती कोणत्या क्रमाने झाली, याबद्दल सर्वसामान्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. खगोल विज्ञानातील अभ्यासक, संशोधक नवा आणि जुना ग्रह कोणता याविषयी संशोधानात विविध दावे करत आले आहेत. तर कोणता ग्रह सर्वात नवीन आणि कोणता ग्रह सर्वात जुना या विषयी संशोधक करताना शास्त्रज्ञांनी दोन मुख्य सिद्धांतांवर भर दिला आहे. त्यामुळे हे दोन सिद्धांत जरी असतले नेमके कोणते ग्रह सर्वात आधी तयार झाले आणि कोणते सर्वात शेवटी, यावर निश्चित मत नाही; मात्र सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या क्रमाकडे पाहिले तर शास्त्रज्ञ दोन मुख्य सिद्धांतांमध्ये विभागले गेले आहेत, ज्यामुळे सर्वात जुना आणि सर्वात तरुण ग्रह कोणता?,
या प्रश्नाची उत्तरे निश्चितपणे मिळत नाहीत. ग्रहांचे वय ठरवण्याचे मार्ग किंवा ग्रह किती जुना आहे हे शास्त्रज्ञ दोन प्रमुख पद्धतींनी ठरवताना दिसतात. रेडिओआयसोटोप डेटिंग या पद्धतीनुसार ग्रहांवरील किंवा उल्कापिंडांवरील खडकांचे विश्लेषण करून त्यांचे वय निश्चित केले जाते. क्रेटर काऊंटिंग या पद्धतीनुसार ग्रहांच्या पृष्ठभागावर असलेल्या खड्ड्यांची संख्या मोजून त्यांचे अंदाजित वय ठरवले जाते. ज्या ग्रहांवर जास्त खड्डे असतात, ते सहसा जुने मानले जातात, कारण त्यांच्यावर जास्त काळ उल्कापिंडांच्या मारा झाला आहे, असे शास्त्रज्ञ मानतात.
मुख्य सिद्धांतांनुसार ग्रहांच्या निर्मितीच्या क्रमाने वैज्ञानिक ज्या दोन सिद्धांतांमध्ये विभागले आहेत. त्यातील पहिल्या सिद्धांतानुसार गॅस आणि बर्फाचे मोठे ग्रह (उदा. गुरू आणि शनि) सूर्यमालेत सर्वात आधी तयार झाले असावेत. दुसर्या एका सिद्धांतानुसार, पृथ्वीसारखे खडकाळ ग्रह सर्वात तरुण असू शकतात आणि ते सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या ग्रहांच्या निर्मितीनंतर किंवा त्यांच्या हालचालीमुळे निर्माण झाले असावेत. सध्या तरी, सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेबद्दल दोन प्रमुख विचारप्रवाह असल्यामुळे, सर्वात जुना किंवा सर्वात तरुण ग्रह कोणता, हे सांगणे शास्त्रज्ञांसाठी वादग्रस्त विषय आहे. याबद्दलचे संशोधन अजूनही सुरू आहे.