जगातील सर्व डास मारले तर काय होईल?

What would happen if all the mosquitoes in the world were killed?
जगातील सर्व डास मारले तर काय होईल?Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : डास नावाचा उपद्रवी कीटक निसर्गाने का निर्माण केला, असे आपल्याला नेहमीच वाटत असते. एक तर कानाभोवती कर्कश गुणगुण करून हे डास नीट झोपू देत नाहीत. शिवाय, चावून बेजार करतात ते वेगळेच. त्यांच्या दंशाने चिकुनगुनिया, झिका, डेंग्यू व मलेरियासारखे आजार फैलावतात ही सर्वात मोठी समस्या आहे. अशावेळी जर एखाद्याला वाटले की, जगातील सर्वच डासांचा नायनाट करता आला तर बरे होईल; पण खरेच असे झाले तर काय होऊ शकते याचा कधी विचार केला आहे का?

डास का आकृष्ट होतात? | पुढारी

डासांचा नायनाट केला तर काय होऊ शकते?

जर जगातील सर्व डासांचा नायनाट केला तर काय होऊ शकते? याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे जाणून घेऊयात, जर तुम्ही सर्व डास मारले तर काय होईल हे जाणून घ्यायचे असेल तर यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. कीटकशास्त्रज्ञ फिल लोनिबस सांगतात की, जगातील सर्व डासांना संपवले तर त्याचे अनेक दुष्परिणाम निसर्गावर होऊ शकतात. ज्याचा परिणाम माणसावरदेखील होऊ शकतो. लोनिबस यांच्या माहितीनुसार, नर डास हे वनस्पतींचा रस पिऊन जिवंत राहतात. त्यांच्यामुळेच वनस्पतींचे परागकण निसर्गात पसरतात. त्यामुळे वनस्पतींमध्ये असलेली फुले ही फळांमध्ये विकसित होतात. त्यामुळे डास हे निसर्गासाठी खूप महत्त्वाचे आहेत. नैसर्गिक अन्नचक्रात डासांना महत्त्वाचे स्थान आहे. अनेक पक्षी आणि वटवाघुळ डास खातात. मासे आणि बेडूक यांचे खाद्यदेखील डासच आहेत. त्यामुळे जर डासच नष्ट केले, तर निसर्गाच्या अन्नसाखळीवर विपरीत परिणाम होऊ शकतात. अनेक शास्त्रज्ञांची मते भिन्न भिन्न आहेत. काही शास्त्रज्ञ सांगतात की, जर डासांना समूळ नष्ट केले तर इतर जीव या नैसर्गिक अन्नसाखळीत त्याची जागा घेतील. जेव्हा पृथ्वी विकसित झाली तेव्हापासून आतापर्यंत अनेक प्रजाती नामशेष झाल्या होत्या. त्यामुळे या प्रजाती नष्ट झाल्यामुळे जग उद्ध्वस्त झाले नाही; पण त्यांची जागा इतर नवीन प्रजातींनी घेतली. डासांचा नायनाट झाल्यानंतर त्याची जागा दुसरे जीव घेतील; पण त्यासोबतच इतर आजारांचा धोकादेखील वाढेल. कारण, ते डासांइतकेच किंवा त्याच्यापेक्षा अधिक घातक असू शकतात. या नव्या जीवाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यानंतर हे नवीन जीव झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक नवीन रोग आणि संक्रमण होऊ शकतात.

What would happen if all the mosquitoes in the world were killed?
पिंपरीत दीड हजारांपेक्षा अधिक घरांत डेंग्यूच्या डास अळ्या

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news