Vegetarian caviar | ‘सीवीड’पासून बनवले शाकाहारी ‘कॅवियर’

Vegetarian-Caviar-Made-From-Seaweed
Vegetarian caviar | ‘सीवीड’पासून बनवले शाकाहारी ‘कॅवियर’File Photo
Published on
Updated on

पॅरिस : मांसविरहित बोलोग्नेस पासून ते वनस्पती-आधारित सॅल्मन पर्यंत, शास्त्रज्ञांनी आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांना शाकाहारी पर्याय देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आता या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात महागड्या आणि खास पदार्थांपैकी एक असलेल्या ‘कॅवियर’ (Caviar- माशाची अंडी) याकडे आपले लक्ष वळवले आहे. ‘झिरोई कॅवियर’ (Zeroe Caviar) या नावाने हा वनस्पती-आधारित माशाच्या अंड्यांचा पर्याय बाजारात आणला गेला आहे. हा कॅवियर समुद्री शैवाल (Seaweed) वापरून तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यात कोणतेही मासे किंवा प्राणी-आधारित उत्पादन नसले, तरी तो अगदी अस्सल कॅवियरसारखाच दिसतो आणि चव देतो, असा दावा कंपनीने केला आहे.

पारंपरिक कॅवियरच्या उत्पादनामुळे होणारे पर्यावरणीय परिणाम लक्षात घेऊन ‘झिरोई’ने हा पर्याय तयार केला आहे. कंपनीच्या वेबसाईटनुसार, ‘आमचा कॅवियर पूर्णपणे वनस्पती-आधारित आहे, म्हणजे त्याच्या उत्पादनात मासे किंवा प्राण्यांचे कोणतेही उत्पादन वापरले जात नाही. ‘पारंपरिक कॅवियर मासेमारीमुळे समुद्रातील अतिरिक्त मासेमारी आणि नैसर्गिक अधिवासाचा नाश होतो. ‘झिरोई कॅवियर’ निवडून, तुम्ही सागरी जीवांचे संरक्षण करणार्‍या आणि जैवविविधतेला प्रोत्साहन देणार्‍या अधिक टिकाऊ अन्न प्रणालीला समर्थन देत आहात, असे कंपनीचे म्हणणे आहे.

हा शाकाहारी कॅवियर फ्रान्सच्या किनारपट्टीजवळ सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या समुद्री शैवालापासून आणि इतर नैसर्गिक घटकांच्या मदतीने बनवला जातो. कंपनी दावा करते की, यातील नाजूक पोत आणि उत्कृष्ट चवीमुळे हा कॅवियर खाण्याचा अनुभव अविस्मरणीय असेल. जरी हा वनस्पती-आधारित पर्याय अस्सल कॅवियरपेक्षा स्वस्त असला, तरी त्याची किंमत सामान्य लोकांसाठी अजूनही खूप जास्त आहे. 50 ग्रॅम ‘झिरोई कॅवियर’साठी तुम्हाला सुमारे रु. 3500 मोजावे लागतील, तर 300 ग्रॅम कॅवियरसाठी सुमारे रु. 10,000 इतका मोठा खर्च येतो!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news