लंडन : पृथ्वीवर प्राण्यांच्या लाखो प्रजाती आढळतात. सर्व प्राण्यांची स्वतःची खासियत असते. पण, पृथ्वीवर जगण्यासाठी प्राण्यांनाही ऑक्सिजन आणि रक्ताची गरज असते. आज आम्ही तुम्हाला अशा प्राण्याविषयी सांगणार आहोत, ज्याच्या रक्ताची किंमत लाखो रुपये आहे. ही किंमत इतकी जास्त आहे की त्यापैशात एक कार सहज विकत घेता येईल.
पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या मानव आणि प्राण्यांना जगण्यासाठी रक्ताची गरज आहे. बहुतेक प्राणी आणि मानवाच्या रक्ताचा रंग लाल असला तरी काही प्राण्यांच्या रक्ताचा रंग पिवळा, निळा आणि हिरवा देखील असतो. पण, कोणत्या प्राण्याचे रक्त सर्वाधिक महाग, असा विचार क्वचितच केला गेला असेल. हे रक्त इतकं महाग आहे की, अगदी 1 लिटर रक्ताच्या किमतीत आलिशान कार खरेदी करू शकता. खरं तर, या प्राण्याचे रक्त इतके महाग आहे कारण त्याचा वापर वैद्यकीय कारणांसाठी केला जातो. शिवाय ते खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
नॅचरल हिस्ट्री म्युझियम आणि मेरीलँड वेबसाईटनुसार, हॉर्सशू क्रॅब हा पृथ्वीवरील 450 दशलक्ष वर्ष जुना जीव आहे. त्याचा इतिहास डायनासोरपेक्षा जुना असल्याचे म्हटले जाते. हे खेकडे इतर खेकड्यांसारखेच दिसतात. त्यांना कवच असते आणि शरीराला शेपूटही असते. या खेकड्यांचे रक्त निळे असते. हा निळा रंग त्यांच्या रक्तात आढळणार्या हेमोसायनिनमुळे आहे. हे तांबे आधारित श्वसन रंगद्रव्य आहे. या रक्ताला निळे सोने असेही म्हणतात.
स्टडी डॉट कॉमच्या वेबसाईटनुसार, 1 लिटर रक्ताची किंमत 15 हजार डॉलर्स म्हणजे सुमारे 12 लाख रुपये आहे. एवढ्या पैशात तुम्ही सहज कार खरेदी करू शकता. या रक्ताचे औषधी मूल्य खूप जास्त आहे. मेरीलँड वेबसाईटनुसार, या जीवाच्या रक्तात एक प्रोटिन असते, ज्याला लिमुलस अमीबोसाईट लायसेट (एलएएल) म्हणतात. हे औषध आणि वैद्यकीय उपकरण उत्पादक त्यांच्या उत्पादनांच्या चाचणीसाठी वापरतात. फाईन डायनिंग लव्हर्स वेबसाईटनुसार, हे प्राणी अमेरिकेत अटलांटिक महासागराच्या किनार्यावर आढळतात. या प्राण्यांच्या रक्तस्राव प्रक्रियेनंतर 10 ते 30 टक्के खेकडे जगत नाहीत.