

नवी दिल्ली : बदलत्या काळानुसार खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदललेल्या आहेत. कारण आजकाल प्रत्येकाला जंक फूड खाण्याचे वेड लागले आहे. अनेकजण सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक वेळा जंक फूडचे सेवन करत असतात. जंक फूड चवीला चविष्ट असतात, पण त्यात आरोग्यासाठी हानिकारक अशा अनेक गोष्टी असल्याने आपल्या आरोग्यासाठी ते घातक ठरू शकतात.