मेंदूसाठी काय लाभदायक व काय हानिकारक?

मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आहाराची विशेष भूमिका
Special role of diet in keeping brain healthy
मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आहार.Pudhari File Photo
Published on
Updated on

आहार आणि जीवनशैलीतील गडबडीमुळे मेंदूशी संबंधित समस्यांचा धोका वाढला असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आहाराची विशेष भूमिका असते. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले पदार्थ मेंदूचे पोषण करतात आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि रोगांपासून संरक्षण करतात. काही पदार्थांचा मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो. याचा तुमच्या स्मरणशक्तीवर आणि मूडवर परिणाम होऊ शकतो आणि दीर्घकाळासाठी स्मृतिभ्रंश सारख्या आजारांचा धोकाही वाढतो. मेंदूसाठी कोणता आहार लाभदायक ठरतो व कोणता हानिकारक, याची ही माहिती...

लाभदायक आहार

  • मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी काही गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

  • चरबीयुक्त मासे हे ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा उत्कृष्ट स्रोत आहेत, त्याच्या सेवनाने स्मरणशक्तीच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

  • पालक, ब्राेकोली यासारख्या पालेभाज्या मेंदूसाठी उत्तम अन्न आहेत.

  • फॅटी माशांप्रमाणे, नटस् आणि बियांमध्ये देखील ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, जे मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात.

  • अक्रोडासारख्या सुक्या मेव्याचे नियमित सेवन केल्याने वयोमानानुसार स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी होतो.

  • बदाम, अक्रोड, हेझलनट आणि सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करणे लाभदायक ठरू शकते.

  • डार्क चॉकलेटचा आहारात समावेश करणे हाही एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे मेंदूच्या आजारांचा धोका कमी करतात.

हानिकारक आहार

  • सोडा, स्पोर्टस् ड्रिंक्स, अ‍ॅनर्जी ड्रिंक्स आणि पॅकेज केलेल्या फळांच्या रसांसारख्या गोड पेयांमध्ये जास्त साखर असते, जी मेंदूसाठी हानिकारक असते.

  • उंदरांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की साखरेचे जास्त सेवन केल्याने मेंदूतील सूज आणि स्मरणशक्तीशी संबंधित समस्या वाढू शकतात.

  • ट्रान्स फॅटस् असलेल्या पदार्थांमुळे स्मरणशक्तीवरही परिणाम होतो आणि त्यामुळे अल्झायमर रोगाचा धोका वाढू शकतो.

  • मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी दारूपासून दूर राहण्याचाही सल्ला दिला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news