जंगली उंदरांच्या साहाय्याने भूकंपाचे पूर्वानुमान

पेरू देशात यावर संशोधन
Rodents may predict the next big quake
भूकंपाची पूर्वसूचना जंगली उंदीर देऊ शकतात.Pudhari File Photo
Published on
Updated on

लिमा : वादळ, पाऊस, सुनामी वगैरे नैसर्गिक आपत्तींच्या पूर्वसूचना देता येऊ शकतात. मात्र भूकंप अचानकच होतात व त्याचे पूर्वानुमान करणे कठीण असते. मात्र, भूकंपाची पूर्वसूचना जंगली उंदीर देऊ शकतात, असे पेरू या देशातील संशोधनात दिसून आले आहे. जगात इ.स.1900 पासूनच्या मोठ्या भूकंपांमध्ये 15 लाख लोक मरण पावले आहेत. मात्र, ही जीवित व वित्तहानी काही प्रमाणात टाळता येऊ शकेल, असे संशोधकांना वाटते. काही जंगली प्राणी त्याची सूचना देऊ शकतात. त्यात जंगली उंदरांचा समावेश आहे.

Rodents may predict the next big quake
अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांत भीती

भूकंप होणार असेल, तर ते आधी जंगली उंदरांना कळते

तीन उपखंडांतून पेरूतील भूकंपाबाबत मिळालेल्या माहितीनुसार भूकंप होणार असेल, तर ते आधी जंगली उंदरांना कळते. 2011 मध्ये अँडियन खेड्यात भूकंप झाला होता, त्या वेळी सात दिवस आधीच यानाचागा शेमिलेन नॅशनल पार्कमधील सर्व प्राण्यांनी पळ काढला होता व त्यांच्या हालचाली कॅमेर्‍याने टिपण्यात आलेल्या आहेत. हे सर्व प्राणी भूकंप होऊन गेल्यानंतर पुन्हा आले. संशोधकांच्या मते त्यांचे निष्कर्ष अंतिम नाहीत; पण त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार प्राण्यांना भूकंपाची पूर्वसूचना मिळत असते. वन्य प्राण्यांच्या हालचालींचा अभ्यास केला, तर आधीच भूकंपाची पूर्वसूचना मिळू शकते. भूकंपात भूगर्भातील दगडाचे थर हलतात व त्यामुळे विद्युतभार निर्माण होतो व जमिनीवरच्या पाण्यात तो येतो तसेच काही धनभारित आयन कमी उंचीच्या वातावरणात येतात. आयनभारित हवेमुळे प्राणी भूकंपाच्या आधी सैरभैर होतात व जास्त क्रियाशील होतात. त्यामुळे त्यांच्या हालचालींवरून भूकंपाचे पूर्वानुमान करता येते.

Rodents may predict the next big quake
Uttar Pradesh earthquake: उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news