

नवी दिल्ली : आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये रक्तदानाद्वारे केले जाणारे रक्त संक्रमण (ब्लड प्यूजन) जीवनदान देणारे ठरले आहे; परंतु दुर्मीळ रक्तगट (रेअर ब्लड टाईप) असलेल्या लोकांसाठी मात्र दात्याचा शोध घेणे मोठे आव्हान असते. जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट म्हणून ओळखला जाणारा आरएच नल (Rh null) हा केवळ 60 लाख लोकांमध्ये एका व्यक्तीमध्ये आढळतो आणि जगभरात केवळ 50 ज्ञात व्यक्तींमध्ये हा रक्तगट आहे.
आरएच नल इतका महत्त्वाचा का?
आरएच नल रक्तगट असलेल्या लोकांमध्ये 50 पैकी एकही आरएच अँटिजेन नसतो. या रक्तगटाला वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्रात ‘गोल्डन ब्लड’ म्हणून ओळखले जाते. कारण, तो प्रकारांच्या कोणत्याही रक्तगटाला सुसंगत असतो. विशेषतः ‘ओ’ प्रकारचा आरएच नल रक्तगट हा जवळजवळ सर्वांसाठी वापरला जाऊ शकतो. आणीबाणीच्या परिस्थितीत, रुग्णाचा रक्तगट अज्ञात असल्यास हा रक्तगट वापरल्यास रिअॅक्शन होण्याचा धोका कमी असतो. रक्तगटाचा नियम आणि अँटिजेन्सरक्तगट निश्चित करण्यासाठी एबीओ आणि र्हेसस (आरएच) या दोन प्रमुख प्रणाली वापरल्या जातात. रक्तपेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या प्रथिने किंवा शर्कराच्या खुणांना अँटिजेन्स म्हणतात. हे अँटिजेन्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती ठरवतात. एखाद्या व्यक्तीला तिच्यापेक्षा वेगळे अँटिजेन्स असलेले रक्त दिल्यास, शरीर त्यावर हल्ला करणारे अँटिबॉडीज तयार करते, ज्यामुळे धोका निर्माण होतो. निगेटिव्ह रक्तगट युनिव्हर्सल डोनर मानला जातो. कारण, त्यात ए, बी किंवा आरएच (डी) अँटिजेन नसतात. मात्र, सध्या 47 ज्ञात रक्तगट आणि 366 हून अधिक अँटिजेन्स आहेत, ज्यामुळे रक्त जुळवण्याचे काम गुंतागुंतीचे होते.
प्रयोगशाळेत गोल्डन ब्लड बनवण्याचे प्रयत्न
युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉलचे प्राध्यापक अॅश टोये आणि जगभरातील संशोधक आता आरएच नल सारखे दुर्मीळ रक्तगट प्रयोगशाळेत तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. रक्तगट आरएच असोसिएटेड ग्लायकोप्रोटिन (आरएचएजी) मध्ये झालेल्या जनुकीय बदलांमुळे (जेनेटिक म्युटेशन) तयार होतो.
संशोधकांनी सीआरआयएसपीआर-9 या तंत्रज्ञानाचा वापर करून अपरिपक्व लाल रक्तपेशींमधून एबीओ, आरएफ, केल, डफी आणि जीपीबी या पाच सर्वात मोठ्या समस्या निर्माण करणार्या रक्तगटांचे अँटिजेन तयार करणारे जनुके हटवले. यामुळे अल्ट्रा-सुसंगत रक्त तयार करण्याचा मार्ग मिळाला आहे, जो आणि सारख्या दुर्मीळ रक्तगटांनाही जुळेल. सध्याची स्थितीप्रयोगशाळेत तयार केलेले रक्त मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यास अजून बराच वेळ आहे. कारण, स्टेम सेल्समधून परिपक्व लाल रक्तपेशी बनवणे आणि त्यांची सुरक्षितता तपासणे आव्हानात्मक आहे. सध्या सुरू असलेल्या ट्रायलमध्ये दात्याच्या स्टेम सेल्सपासून प्रयोगशाळेत तयार केलेल्या लाल रक्तपेशी मानवांना देण्याची सुरक्षितता तपासली जात आहे.