पाण्याबरोबर हिरे वाहून आणणारी नदी!

2 वर्षांपूर्वी शेतकर्‍याला सापडला होता 72 कॅरेटचा हिरा
rainy season runjh river carries diamonds along with water
पावसाळ्यात ही नदी पुराबरोबर हिरेही घेऊन येते.Pudhari File Photo
Published on
Updated on

बुंदेलखंड : जर नशिबात पैसा असेल, कोट्यधीश व्हायचे स्वप्न पाहात असाल, तर मध्य प्रदेशमधील एका नदीत नशीब आजमावण्यास निश्चितच हरकत नसेल. कारण, या नदीत वाहून येणारे छोटे-मोठे दगड, रेती चाळून रातोरात नशीब बदलू शकते. हे खरोखर घडले आहे. या नदीला पूर येतो तेव्हा पाण्याबरोबर हिरेही वाहून येतात, असे इथे सांगितले जाते.

खोदकामात मजुराला सापडले तीन हिरे!

पावसाळ्यात ही नदी पुराबरोबर घेऊन येते हिरे

ही नदी मध्य प्रदेशात बुंदेलखंडच्या पन्ना जिल्ह्यात आहे. अजयगड तालुक्यात उगम पावणार्‍या या नदीचे नाव रुंझ असे आहे. पावसाळ्यात ही नदी पुराबरोबर हिरेही घेऊन येते, असे म्हटले जाते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीकाठी अनेक लोक खडी आणि दगड-रेतीमध्ये हिरे शोधताना दिसतात.

या नदीतून 2 वर्षांपूर्वी सापडला होता 72 कॅरेटचा हिरा

या नदीतून 2 वर्षांपूर्वी एका शेतकर्‍याला 72 कॅरेटचा हिरा सापडला होता. ही बातमी पसरताच हजारो लोक हिर्‍याचा शोध घेण्यासाठी पोहोचले होते; मात्र हा परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने सर्वांना तेथून हटवून नदीकिनारी येण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतरही लोक गुपचूप नदीकाठी पोहोचतात. असे हिरे शोधून लोक आपले नशीब आजमावतात. हा हिरा जितका मौल्यवान आहे, तितकाच तो मिळवणे महाकठीण आहे, ही याची आणखी एक खासियत. नदीकाठी लोक फावडे, संबळ, तसला आणि जाळीच्या टोपल्या घेऊन हिर्‍यांच्या शोधात येतात. आजही रुंझ नदीच्या काठी काही नादिष्ट लोक हिर्‍याचा शोध घेताना दिसतील. नदीच्या खालच्या भागाव्यतिरिक्त दोन्ही किनार्‍यांवर त्यांचा शोध सुरू असतो.

या नदीवर रुंझ धरण बांधण्यात येत आहे

नदीतून आलेली रेती टोपलीत घालून बाहेर काढतात आणि त्यातून हिरा शोधतात. याशिवाय प्रवाह जास्त असलेल्या भागात जाळीच्या टोपल्यांच्या साहाय्याने शोध घेतला जातो. नदीकाठचे दगड खोदूनही हिरे शोधतात. प्रत्येकजण आपापल्या परीने मेहनत घेतो; पण जो सर्वात नशीबवान आहे त्याला खजिना मिळतो. या नदीवर रुंझ धरण बांधण्यात येत असून, त्याचे काम वेगाने सुरू आहे. सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच धरणाचे बांधकाम पूर्ण होईल आणि हा नदीचा परिसर बॅकवॉटर म्हणून पाण्यात जाईल. धरण बांधल्यानंतर नदीचा हा परिसर शेकडो फूट खोल पाण्यात बुडणार आहे. त्यानंतर कदाचित लोकांचे इथे येणेही बंद होईल आणि हिर्‍यांचा शोधही थांबेल.

‘येथे’ जमिनीखाली दडलेत ३.४२ कोटी कॅरेट हिरे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news