तुर्कीमध्ये सापडला सोन्याच्या नाण्यांचा खजिना

नाणी ग्रीक असली, तरी त्यांच्यावर पर्शियन साम्राज्याचा छाप
Pot of Persian gold coins found in Turkey
तुर्कीमध्ये सोन्याच्या नाण्यांचा खजिना सापडला.Pudhari File Photo
Published on
Updated on

इस्तंबुल : तुर्कीमध्ये पुरातत्त्व संशोधकांना प्राचीन ग्रीक नाण्यांनी भरलेले एक भांडे सापडले आहे. ही सर्व नाणी सोन्याची आहेत, हे विशेष. पश्चिम तुर्कीमधील नोशन नावाच्या प्राचीन ग्रीक शहरात एका घराखाली खोली सापडली होती. याच खोलीमध्ये हा सोन्याच्या नाण्यांचा खजिना सापडला आहे. ही नाणी ग्रीक असली, तरी त्यांच्यावर पर्शियन साम्राज्याचा छाप आहे. नोशनपासून 97 किलोमीटरवर असलेल्या सार्डिस या ठिकाणच्या टांकसाळीत ही नाणी पाडलेली असावीत, असे संशोधकांना वाटते.

ही नाणी इसवी सन पूर्व पाचव्या शतकातील

अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीतील ख्रिस्तोफर रॅट्टे यांनी याबाबतची माहिती दिली. एखाद्या मर्यादित पुरातत्त्वीय उत्खननात इतका मौल्यवान शोध लागणे ही एक दुर्मीळ बाब असल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळातील कुणी तरी सुरक्षेचा विचार करून ही सोन्याची नाणी पुरून ठेवलेली असावीत. काही पुराव्यांचा विचार करता ही नाणी इसवी सन पूर्व पाचव्या शतकात बनवलेली असावीत. गेल्या काही वर्षांच्या काळात या ठिकाणी प्राचीन काळातील अनेक वस्तूंचा शोध लागला आहे. त्यामध्ये मातीच्या भांड्यांचा तसेच शस्त्रांचा समावेश आहे. या वस्तू अलेक्झांडर द ग्रेट याच्यानंतरच्या ‘हेलेनिस्टिक’ काळातील आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news