‘या’ दुर्बिणीत असणार 3200 मेगापिक्सेल कॅमेरा!

Published on
Updated on

न्यूयॉर्क :

भविष्यातील व्हेरा सी. रूबीन वेधशाळेतील दुर्बिणीत तब्बल 3200 मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल. या कॅमेर्‍याने आता चाचण्यांमध्ये पहिले-वहिले फोटो टिपले आहेत. एखाद्या महाकाय डिजिटल कॅमेर्‍याने टिपलेल्या सर्वात मोठ्या शॉटचा हा विश्‍वविक्रम आहे. या कॅमेर्‍याचे रिझोल्युशन इतका आहे की एखादा गोल्फ बॉल 25 किलोमीटरवरूनही स्पष्टपणे दिसू शकेल!

कॅलिफोर्नियाच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीज (डीओई) एसएलएसी नॅशनल अ‍ॅक्सेलरेटर लॅबोरेटरीने या कॅमेर्‍याच्या चाचण्या घेतल्या. एखाद्या छोट्या कारच्या आकाराचा हा कॅमेरा आहे. त्याच्या इमेजिंग सेन्सरने 3200 मेगापिक्सेलची छायाचित्रे टिपली. हे फोटो 'लार्जेस्ट सिंगल-शॉट पिक्चर्स' ठरले. ते इतके मोठे आहेत की त्यापैकी एक पूर्णपणे दाखवण्यासाठी 378 फोर के अल्ट्रा-हाय-डेफिनेशन टी.व्ही.ची गरज आहे. एरोन रूडमॅन नावाच्या वैज्ञानिकांनी याबाबतची माहिती दिली. अंतराळ संशोधन क्षेत्रात अशा कॅमेर्‍याची चांगली मदत होऊ शकेल असे संशोधकांना वाटते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news