पहिली हायब्रीड इलेक्ट्रिक बाईक | पुढारी

Published on
Updated on

लंडन : ऑटोमोबाईल क्षेत्राचे 'इलेक्ट्रिक पॉवर सोर्स' हेच भविष्य आहे असे नेहमीच म्हटले जाते. त्याची प्रचिती सध्या मोठ्या प्रमाणात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन व विक्री यामध्ये मोठीच वाढ झाली आहे. सुरुवातीच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लेड अ‍ॅसिटेट बॅटरी वापरली जात होती. त्यानंतर लिथियम आयन बॅटरीचा वापर सुरू झाला. आता 'नावा टेक्नॉलॉजी'ने एक नवी संकल्पना आणली आहे. कंपनीने जगातील पहिली हायब्रीड इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे. या कन्सेप्ट बाईकमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा वापर करण्यात आला आहे. आता या कन्सेप्टला लवकरच वर्किंग प्रोटोटाईपमध्ये सादर केले जाऊ शकते.

या इलेक्ट्रिक बाईकला सध्या फे्रंच बॅटरी कंपनी वायएसवाय ग्रुपच्या सहकार्याने विकसित केले जात आहे. 1960 च्या काळातील कॅफे रेसर स्टायलिंगवर आधारित ही बाईक आहे. तिच्यामध्ये रेट्रो लूकच्या एलईडी हेडलॅम्पचा वापर करण्यात आला आहे. त्याबरोबरच बाईकमध्ये इंटिग्रेटेड सर्क्युलर एलईडी डीआरएल, ब्लॅक अलॉय वील्ज आणि स्मूद प्लोईंग लाईन्सचा वापर केला आहे. या बाईकचे वजन अन्य इलेक्ट्रिक बाईक्सच्या तुलनेत अतिशय कमी आहे. 150 किलो वजनाची ही बाईक हाताळण्यास सोपी आहे. बाईकचा कमाल वेग ताशी 160 किलोमीटर आहे. ही बाईक 300 किलोमीटर रेंजची आहे. केवळ 60 मिनिटांत ही बाईक 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news