आजींनी नऊ कोटींचा दगड ठेवला होता दारात!

आयुष्यभर दार रोखण्यासाठी लावलेला दगड रोमानियाच्या सरकारला विकण्याचा निर्णय
Grandmother kept a stone worth nine crores at the doormat
आजींनी दार रोखण्यासाठी नऊ कोटींचा दगड ठेवला होता.Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडनः एखाद्या वस्तूची किंमत अनेकांना कळत नाही. साध्याच वाटणार्‍या काही वस्तूही अमूल्य असू शकतात व ते कालौघात स्पष्ट झाले की सगळेच थक्क होतात. युरोपमधील रोमानिया देशातील एका छोट्याशा गावात राहणार्‍या वृद्ध महिलेने मागील अनेक दशकांपासून न कळत अशीच एक मौल्यवान वस्तू जपून ठेवल्याचं उघड झालं आहे. मागील अनेक वर्षांपासून दरवाजा आपटू नये म्हणून जो दगड ही महिला वापरत होती तो मौल्यवान असल्याचं समोर आलं आहे. हा दगड साडेतीन किलोंचा आहे. हा खडक ‘अंबर नगेट’ म्हणजेच आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्राचीन काळात डिंकासारख्या पदार्थापासून बनलेला खडकासारखा प्रकार असल्याचं समोर आलं आहे. या खडकाची किंमत आजच्या घडीला 9 कोटी रुपये इतकी आहे.

‘नासा’च्या रोव्हरने मंगळावर शोधला रहस्यमयी खडक

38.5 कोटी ते 7 कोटी वर्षांपूर्वीचा खडक

आतापर्यंतच्या मानवी इतिहासामध्ये सापडलेला हा अशाप्रकारचा सर्वाधिक वजनाचा खडक आहे. या खडकासारखा दिसणारा मौल्यवान दगड एका नदीपात्रात या आजीबाईंना सापडला होता. ‘एल पैस’ या प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, प्रोव्हेन्शीअल म्युझिअम ऑफ बुझौचे संचालक डॅनिअल कोस्टेच यांनी हा खडक मौल्यवान असल्याचं ओळखलं आणि त्याची खरी किंमत सांगितली आहे. पोलंडमधील कारको येथील म्युझिअम ऑफ हिस्ट्री येथे हा खडक पाठवण्यात आला असून, आता हा खडक 38.5 कोटी ते 7 कोटी वर्षांपूर्वीचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. दुर्देवाने ज्या आजी हा खडक दरवाजा रोखून धरण्यासाठी वापरायच्या आणि ज्यांना हा नदीत सापडला त्यांचा मृत्यू 1991 साली झाला आहे. या आजींच्या मृत्यूनंतर हा दगड त्यांच्या एका नातेवाईकाकडे होता. त्याला हा सामान्य दगड नाही हे समजलं आणि त्याने हा खडक रोमानियाच्या सरकारला विकण्याचा निर्णय घेतला.

रोमानियाच्या सरकारला विकण्याचा निर्णय

तज्ज्ञांनी हा खडक मौल्यवान असल्याचं निश्चित केलं आहे. ‘वैज्ञानिक आणि संग्रहालयाच्या दृष्टिकोनातून हा शोध फार महत्त्वाचा आहे’, असं डॅनिअल कोस्टेच यांनी म्हटलं आहे. या खडकाचं मूल्य पाहिल्यास सरकारच हा खडक या आजींच्या नातेवाईकाकडून विकत घेण्याची दाट शक्यता आहे. आता यासंदर्भात पुढील वाटाघाटी होतील, असं सांगितलं जात आहे. या महिलेच्या नातेवाईकांनी मध्यंतरी घरी एकदा चोरी झाली तेव्हा चोरांनी सोन्याचे काही दागिने चोरुन नेले होते. ते लोक या दगडासमोरून गेले तरी त्यांनी तो चोरला नाही! रोमानियामधील बुझौ प्रांतामध्ये अशाप्रकारे यापूर्वी अनेकदा मौल्यवान खडक सापडले आहेत. या भागात असे अनेक अति पुरातन खडक असल्याचे सांगितलं जातं.

Grandmother kept a stone worth nine crores at the doormat
मंगळावर दिसला हत्तीसारखा खडक!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news