जंक फूडच्या सेवनाने होते हेपिटायटिसप्रमाणेच यकृताची हानी

फास्ट फूड सेवन केल्याने यकृतावर आणखी वाईट परिणाम
fast food can be damaging your liver
जंक फूडच्या सेवनाने यकृताची हानी होते. Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जंक फूड सेवन केल्याने केवळ जाडी वाढते असे नाही तर हेपिटायटिसमध्ये यकृत जसे खराब होते तसाच वाईट परिणाम होतो, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. फास्ट फूडमुळे मानवी यकृतावर एका महिन्यातच फार विपरीत परिणाम होतो. नेहमी फास्ट फूड सेवन केल्याने यकृतावर आणखी वाईट परिणाम होतो. या फास्ट फूडमध्ये फ्राइड चिकन, अनियन रिंग्ज (कांद्याच्या फ्राइड चकत्या) तळलेले वेफर्स यांचाही समावेश होतो.

फास्ट फूड, जंक फूड सातत्याने सेवन करणे यकृतासाठी घातक

डॉ. ओरडॉन यांनी सांगितले की, मेद व संपृक्त मेद यामुळे यकृतात चरबी साठत जाते. आपणच याला जबाबदार आहोत. मुले मोठ्या प्रमाणावर फास्ट फूड सेवन करीत असतात असे दिसून येते, ही दुर्दैवी बाब आहे. यकृतात फास्ट फूड सेवनामुळे जी वितंचके तयार होतात ती हेपिटायटिसमध्ये निर्माण होतात तशीच असतात. त्यामुळे कालांतराने यकृताचे काम बंद पडते. फ्रेेंच फ्राइज हा सगळ्यात घातक प्रकार आहे, कारण त्यात बटाट्यामध्ये अनेक घातक पदार्थ मिसळलेले असतात. मीठ टाकून बटाट्याच्या चकत्या तेलात तळणे हे तर केले जाते, पण वरून त्यात साखर टाकली जाते. कारण त्यामुळे ते कुरकुरीत होतात, पण शरीराला हे घातक आहे. त्यामुळे यकृतावर एकदा नव्हे तीनदा आघात होतो. सॅलड्समध्येही अनेक घातक रसायने वरून टाकली जातात. काही वेळा तर सॅलड्समध्ये प्रॉपलिन ग्लायकॉल टाकले जाते, कारण त्यामुळे भाज्या गोठत नाहीत, शिळ्या होत नाहीत. या ग्लायकॉलमुळे काही फार हानी होत नाही, कारण ते थोडे टाकलेले असते असे म्हणतात; पण ते खरे नाही! सध्या अनेक प्रकारचे फास्ट फूड, जंक फूड पाहायला मिळते व लोक हे चटकमटक पदार्थ आवडीने खात असतात. त्याचे सातत्याने सेवन करणे यकृतासाठी घातक ठरू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news