पाण्याचे अतिसेवन मेंदूसाठी हानिकारक

जास्त पाणी पिणे हे शरीरासाठी अनेक प्रकारे हानिकारक
Excessive intake of water is harmful for the brain
पाण्याचे अतिसेवन मेंदूसाठी हानिकारक.Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : ‘अति सर्वत्र वर्जयेत’ असे आपल्याकडे एक समर्पक संस्कृत वचन आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. मीठ, साखर, चॉकलेट, चहा, कॉफीसारख्या अनेक पदार्थांबाबत हा नियम लागू आहे. ‘भरपूर झोप घ्यावी’ असे तज्ज्ञ सांगतात म्हणून कुणी दिवसरात्र झोपा काढत राहिला तर ते हानिकारकच ठरते. रात्रीची सात ते आठ तासांची झोप आरोग्यासाठी उत्तम असते. तसाच प्रकार पाण्याचाही आहे. ‘भरपूर पाणी प्यावे’ असा सल्ला दिला जात असतो. मात्र पाणी पिण्यालाही काही मर्यादा असावी. अत्याधिक प्रमाणात पाणी पित राहिल्याने मेंदूला धोका संभवतो, असे तज्ज्ञ सांगतात.

आपल्या शरीरासाठी पाणी महत्त्वाचे आहे. शरीराचा बराचसा भाग पाण्याने बनलेला आहे. आपले शरीर अन्न किंवा उर्जेशिवाय आठवडे किंवा कधीकधी महिने जाऊ शकते, परंतु पाण्याशिवाय आपण काही दिवसही जगू शकत नाही. जर आपल्याला पाणी मिळाले नाही तर काही काळ पाण्यामुळे आपले शरीर निर्जलीकरण होते, ज्यामुळे चक्कर येणे आणि इतर अनेक समस्या निर्माण होतात. मात्र जास्त पाणी पिणे हे शरीरासाठी अनेक प्रकारे हानिकारक आहे. जास्त पाण्यामुळे मेंदूला सूज येऊ शकते, ज्यामुळे मानसिक गोंधळ आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवतात. जास्त पाणी पिल्याने आपल्या शरीरातील रक्तदाब वाढतो, ज्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब, ब्रॅडीकार्डिया किंवा कमी हृदय गती सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. पाण्यात सर्वाधिक हायड्रोजन असते. हायड्रोजन एक इलेक्ट्रोलाइट आहे, ज्यामुळे आपल्या शरीरात हायपोनेट्रेमिया सारखी स्थिती निर्माण होते. सोडियम हा आपल्या शरीरात आढळणारा एक आवश्यक घटक आहे, ज्याचे कार्य आपल्या पेशींच्या आत आणि बाहेर द्रव वाहतूक करणे आहे. जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात असलेले सोडियम पातळ होते आणि त्यामुळे पेशींच्या आसपास आढळणारा द्रव शरीरातून लघवीद्वारे बाहेर पडतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news