शरीरात पाण्याच्या कमतरतेचा वाईट प्रभाव हा त्वचा किंवा बॉडी डिटॉक्सिफिकेशनवरचं नाही तर हृदयावरही पडू शकतो. कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे हार्टअॅटॅकसारख्या समस्या उद्भवू शकतात. पाण्याच्या कमतरतेचा परिणाम हा सरळ हृदयाच्या आरोग्यावर पडतो. ज्यात हृदय आणि त्याच्या कार्डियोवॅस्कुलर सिस्टमचा समावेश आहे. त्याची ही माहिती...
शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन ठेवण्यासाठी पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतात, ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊन थेट हृदयावर परिणाम होतो.
पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होऊ शकते, ज्यामुळे ब्लड फ्लो म्हणजेच रक्तप्रवाह हळू होतो. रक्त घट्ट झाल्यावर हृदयाला ते पंप करण्यासाठी जास्त प्रेशर द्यावे लागते. ही स्थिती हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाशी निगडित अन्य समस्यांसाठी कारणीभूत ठरते.
पाणी शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी मदत करते. पाण्याच्या कमतरतेने शरीराचे तापमान असंतुलित होऊ शकते, ज्यामुळे हृदयावर दबाव वाढू शकतो. असे बहुतांशी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होते.
शरीरात पाण्याची कमतरता झाली की किडनी संबंधित समस्या निर्माण होतात. तसेच किडनी आणि हृदय एकमेकांशी निगडित असल्याने किडनीला काही अपाय झाल्यास त्याचा प्रभाव हा हृदयावर सुद्धा पडतो.