एक चाकाची इलेक्ट्रिक बाईक! | पुढारी

Published on
Updated on

बीजिंग :

सध्या इलेक्ट्रिक कार आणि बाईक्सवर अधिक फोकस केला जात आहे. आता चीनची ई-कॉमर्स कंपनी 'अलीबाबा'ने अतिशय 'हट के' डिझाईन असलेली इलेक्ट्रिक बाईक सादर केली आहे. ही बाईक केवळ एकाच चाकाची आहे! ती एकदा चार्ज झाली की शंभर किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. तिचा चार्जिंग टाईमही अधिक नाही.

या बाईकमध्ये पारंपरिक स्टीलचा 'ट्रेलिस फ—ेम' देण्यात आला आहे. तसेच त्यामध्ये फ्युएल टँक आणि एक सीट आहे. टँकचे डिझाईन बर्‍याच अंशी डुकाटी मॉन्स्टरची आठवण करून देणारे आहे. विशेष म्हणजे यामध्ये दुसर्‍या प्रवाशासाठी एक रियर पिलियन सीटही आहे. या सिंगल-व्हील बाईकची इलेक्ट्रिक मोटर 2 हजार वॅटची ऊर्जा निर्माण करते. बाईकचा कमाल वेग ताशी 48 किलोमीटर इतका आहे. एखाद्या सामान्य बाईकच्या तुलनेत ती हलकी असून तिचे वजन केवळ 40 किलोग्रॅम आहे. बॅटरीला फूल चार्ज करण्यासाठी 3 ते बारा तासांचा वेळ लागतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news